इकरा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. इक्बाल शाह यांचे निधन

जळगावच्या शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा
खान्देश टाइम्स न्यूज l २२ डिसेंबर २०२५ l जळगाव l येथील शैक्षणिक क्षेत्रातील एक अतिशय आदरणीय आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्व, प्रा. डॉ. इक्बाल शाह मजीद शाह यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण जिल्ह्यात आणि शैक्षणिक वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे.
डॉ. इक्बाल शाह यांनी आपल्या आयुष्याचा मोठा काळ शिक्षणासाठी समर्पित केला होता. ते इक्रा एज्युकेशन सोसायटी तसेच मिल्लत एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शैक्षणिक संस्थांनी प्रगती साधली असून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली झाली होती.
अंत्यसंस्काराची माहिती
त्यांच्या पार्थिवावर उद्या, मंगळवार दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता अंत्यसंस्कार (तदफीन) करण्यात येतील. त्यांची अंत्ययात्रा सालाार नगर येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघेल.
डॉ. इक्बाल शाह यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबात ३ मुले आणि ४ मुली असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडिया आणि विविध संस्थांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.





