खान्देशगुन्हेजळगांवसामाजिक

बसमध्ये महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी करणाऱ्या दोन महिला जेरबंद 

बसमध्ये महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी करणाऱ्या दोन महिला जेरबंद 

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व पोत चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणांचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने दोन महिला चोरट्यांना जेरबंद करत मोठे यश मिळविले आहे.
बसस्थानकात वारंवार मंगळसूत्र चोरी होत असल्याबाबत दाखल गुन्ह्यांच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू करण्यात आला होता. या तपासादरम्यान संशयावरून माया दहिमल भोसले उर्फ माया उदय पवार (वय २०) व अंकिता अर्जुन पवार (वय ३५), दोघीही रा. पळासखेडा, ता. चिखली, जि. बुलढाणा, यांना ताब्यात घेण्यात आले.
सखोल चौकशीत या दोन्ही महिलांनी मागील एक ते दीड महिन्याच्या कालावधीत जळगाव बसस्थानकात दोन वेळा बसमध्ये चढणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र पोत चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुरनं. ३१५/२०२५ व गुरनं. ३१८/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्ह्यांशी त्यांचा संबंध स्पष्ट झाला. चोरीस गेलेला मुद्देमालही गुन्ह्याच्या तपासकामी जप्त करण्यात आला असून, पुढील तपासासाठी आरोपी महिलांना मुद्देमालासह जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, शेखर डोमाळे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रवी नरवाडे, पोलीस हवालदार गोपाल गव्हाळे, हरीलाल पाटील, संदीप पाटील, प्रविण मांडोळे, पोलीस अंमलदार गोपाल पाटील, राहुल कोळी, महिला पोलीस हवालदार अभिलाशा चहाटे, महिला पोलीस नाईक श्रद्धा सोनवणे, महिला पोलीस अंमलदार दर्शना पाटील, प्रियंका कोळी, मंगला तायडे तसेच चालक पोलीस हवालदार दीपक चौधरी यांचा समावेश होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button