
प्रभाग २ (अ) मधून सागर सोनवणे बिनविरोध
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि महायुतीची विजयी घोडदौड सुरूच असून, प्रभाग क्रमांक २ (अ) मधून शिवसेनेचे सागर शामकांत सोनवणे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यांच्या विरोधातील अपक्ष उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतल्याने सागर सोनवणे यांचा विजय निर्विवाद ठरला असून, महायुतीसाठी हा सातवा मोठा विजय मानला जात आहे.
आज २ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीत राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला होता. प्रभाग २ (अ) मध्ये सागर सोनवणे यांच्या विरोधात उभे राहिलेल्या उमेदवारांची मनधरणी करण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आले. या यशस्वी राजकीय खेळीमुळे शिवसेनेने जळगावच्या मैदानात आपली ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.





