खान्देश टाइम्स न्यूज | जकी अहमद | चाळीसगाव तहसील कार्यालयातील फौजदारी लिपिक दीपक बाबूराव जोंधळे यांस अडीच हजारांची लाच स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेण्यात आले.
तक्रारदार यांचे पक्षकारांविरुद्ध दाखल गुन्ह्यात मेहुनबारे पोलीस स्टेशनकडून प्रतिबंधक कारवाईचा प्रस्ताव तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी चाळीसगाव यांच्याकडे सादर करण्यात आला होता. याच प्रतिबंधक कारवाईचे प्रकरण दाखल करून त्यामधील आरोपी यांना पुढील तारीख न देता जामिनावर मुक्त करण्याकरिता मदत करण्यासाठी लिपिक दीपक जोंधळे याने २ हजार ५०० रुपये लाचेची मागणी केली होती. जोंधळे यांनी पंचांसमक्ष स्विकारताच पथकाने त्यांच्या मुसक्या आवळल्या आहे. जोंधळे यांचे विरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सापळा पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्यासह हवालदार राजन कदम, शरद काटके, पो. शि. संतोष पावरा, गायत्री पाटील, मकरंद पाटील, चालक पोहवा सुधीर मोरे यांनी लावला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे पथकाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार वाचक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.