खान्देशजळगांवसामाजिक

जळगावात ‘भरोसा सेल व समुपदेशन केंद्र’ इमारतीचे भूमिपूजन

जळगावात ‘भरोसा सेल व समुपदेशन केंद्र’ इमारतीचे भूमिपूजन

महिला व बालकांच्या तक्रार निवारणासाठी आधुनिक सुविधा; सुमारे २.९७ कोटींच्या प्रकल्पास मंजुरी

जळगाव : प्रतिनिधी महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच त्यांच्या तक्रारींचे तत्पर निवारण करण्याच्या उद्देशाने उभारण्यात येणाऱ्या ‘भरोसा सेल व समुपदेशन केंद्र’ या नवीन इमारतीचे भूमिपूजन रविवारी जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात उत्साहात पार पडले. या इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
महिला व बालकांसाठी एकाच ठिकाणी सुविधा
जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या पुढाकारातून उभारण्यात येणाऱ्या या केंद्रामध्ये पीडित महिला व बालकांना एकाच छताखाली कायदेशीर मदत, मानसिक समुपदेशन तसेच पोलीस सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज असे हे केंद्र सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार असल्याचे सांगण्यात आले.
२९७ लाखांचा प्रकल्प
या इमारतीसाठी जिल्हा नियोजन समिती (डीपीडीसी) निधीतून २९७ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव यांच्या देखरेखीखाली करण्यात येणार आहे.
बांधकामाची जबाबदारी ठेकेदार कंपनीकडे
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल पाटील आणि उपविभागीय अधिकारी सुनील देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मे. जगन्नाथ इन्फ्रा कंपनी, चाळीसगाव यांच्यामार्फत या इमारतीचे बांधकाम पूर्ण केले जाणार आहे.
पोलीस अधिकारी उपस्थित
कार्यक्रमाची सुरुवात पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या प्रास्ताविकाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी केले.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस निरीक्षक सतीश गोराडे, पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह जळगाव शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

या उपक्रमामुळे महिला व बालकांना तक्रार निवारणासाठी अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह वातावरण मिळेल, असा विश्वास व्यक्त करत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव पोलीस दलाच्या पुढाकाराचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button