
iMDAD ग्रुप फाउंडेशनकडून जकात-फित्रासाठी सहकार्याचे आवाहन
जिल्हा स्तरावर गरजूंपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी नागरिकांना पुढाकार घेण्याचे आवाहन
जळगाव : प्रतिनिधी iMDAD ग्रुप फाउंडेशनतर्फे सुरू असलेल्या इज्तेमाई जकात उपक्रमासाठी नागरिकांनी आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अब्दुल अजीज सालार यांनी केले आहे.
संस्थेच्या वतीने जकात, फित्रा व इतर देणग्यांद्वारे जमा होणारी रक्कम जिल्हा स्तरावर गरजू व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी आपल्या क्षमतेनुसार १००, २००, ५०० किंवा १००० रुपये अथवा त्यापेक्षा अधिक रक्कम जमा करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमातून समाजातील गरजू कुटुंबांना मदत करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून नागरिकांनी आपल्या जकात व फित्र्याचा काही भाग या उपक्रमासाठी द्यावा, असेही त्यांनी नमूद केले.
अधिक माहितीसाठी व आर्थिक सहकार्यासाठी इच्छुकांनी अब्दुल अजीज सालार यांच्याशी ९८२२०५५९१४ व ९४२३५७८६१४ या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




