पाचोरा :- आ. किशोर पाटील व पत्रकार संदीप महाजन यांच्यात झालेल्या वादाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले असून आगामी काळात हा वाद विकोपाला जाउन अनर्थ घडू नये. तसेच शहर व मतदार संघाची शांतता भंग होऊ नये म्हणून या विषयाला राजकीय वळण न देता मी दोघांनाही एक पाउल मागे घेत हा वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. माझ्या या प्रयत्नाला नक्कीच यश येईल, असा विश्वास राष्ट्रवादीचे मा. आ. दिलीप वाघ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
निवास स्थानी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला न.पा.चे गटनेते संजय वाघ, रणजित पाटील, खलिल देशमुख, प्रकाश भोसले, शशी चंदिले, सुनील पाटील, बंटी महाजन व गोपी पाटील आदी उपस्थित होते. या वेळी दिलीप वाघ म्हणाले की, मतदार संघातील ७ वर्षांच्या बालिकेवरील अत्याचाराची घटना ही मन सुन्न करणारी आहे. यासंदर्भात सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत असून समाजमनाच्या भावना संतप्त आहेत. आम्हीही लोकप्रतिनिधी या नात्याने आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह या घटनेचा माजी आमदार दिलीप वाघ यांच्या निषेध केला आहे.
आ. किशोर पाटील व पत्रकार संदीप महाजन यांच्यात वेगळाच वाद निर्माण होऊन शहरासह तालुक्यात वेगळ्याच चर्चेला उधान आले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष पाचोऱ्याकडे लागले. या घटनेमुळे मूळ विषय बाजुला राहिला आहे. या प्रकरणातील आरोपी पोलिसांना सहकार्य करत नसल्याने तपासात अनेक अडचणी येत आहे. अशात लोकप्रतिनिधी आणि पत्रकार यांच्यातील वाद हा वेगळे वळण घेतआहे.
मतदार संघात सामाजिक आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतील. मतदार संघात यापूर्वी असे घडले नव्हते. दोघांनी ही परिस्थिती समजून घेतली पाहिजे. हा वाद दोघांनी आहे त्या स्थितित थांबवण्यासाठी मी स्वतः आमदारांना फोन करणार आहे. तर पत्रकार संदीप महाजन यांच्याशी बोलणार आहे. माझा विश्वास आहे की, हा विषय येथेच थांबून मूळ विषयाला गती देण्यास पत्रकार आणि लोकप्रतिनिधींचे सहकार्य मिळेल वा आगामी काळात अनेक मोर्चे, आरोपीला कठोर शासन होण्यास मदत होईल असेही त्यांनी सांगितले.