जळगाव ;- वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन अर्थातच महाराष्ट्र फुटबॉल बॉडी मुंबई ने वेस्ट बंगाल येथे ३ ते १३ सप्टेंबर पर्यंत होणाऱ्या राष्ट्रीय सब ज्युनिअर मुलं आणि मुलींच्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा संघ निवडण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील उत्कृष्ट दोन मुले व दोन मुलींची निवड करून पाठविण्याचे आदेश केल्याने जळगाव जिल्ह्यातून खालील खेळाडूंची निवड जिल्हा संघटनेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील व सचिव फारूक शेख यांनी घोषित केली आहे. हे प्रशिक्षण शिबिर हे कुपरेज फुटबॉल ग्राउंड,मुंबई येथे १५ ऑगस्ट पासून सुरू होणार आहे.
शिबिरासाठी निवड झालेले खेळाडू खालील प्रमाणे
१४ वर्षातील मुली – संस्कृती मेढे तापी पब्लिक स्कूल भुसावल , अनन्या पाटील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल जळगाव , १४ वर्षातील मुले – अथर्व तिवारी , सेंट अलायसिस भुसावल नील सराफ , पोद्दार इंटरनॅशनल स्कूल जळगाव यांचा समावेश आहे.
सदर खेळाडूंना छोटे खानी कार्यक्रमात निरोप देण्यात आला. यावेळी संघटनेचे डॉ अनिता कोल्हे, प्रा डॉ अस्मिता पाटील, अब्दुल मोहसीन, ताहेर शेख, मनोज सुरवाडे, इम्तियाज शेख, भास्कर पाटील, आमिर शेख तसेच पालक वर्गांची उपस्थिती होती.