जळगाव ;- मेहरून येथील हजरत शेखूल हिंद उर्दू प्राथमिक शाळा येथील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेश वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मदरसा अनवारूल उलूमचे प्रमुख मौलाना रहमान होते. प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, संचालक अब्दुल राऊफ व मुजाहिद खान(सिकलगर बिरादरी) सह रफिक पटवे व अल्ताफ शेख यांची उपस्थिती होती.
बिरादरीचे ११ वर्षा पासून गणवेश वाटपात सातत्य
जळगाव जिल्हा मन्यार बिरादरी मार्फत मागील अकरा वर्षापासून या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेश वाटप बिरादरीच्या माध्यमाने करण्यात येते. यावर्षी गरजू विद्यार्थ्यांची संख्या बघता १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेश देण्याची घोषणा बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी केली आहे.
त्यासोबत शाळेला लागणारे क्रीडा साहित्य सुद्धा बिरादरी व स्पोर्ट्स हाऊस जळगाव तर्फे दिले जात आहे.
कार्यक्रमा ची सुरवात विद्यार्थी मोहम्मद साद याचे कुराण पठनाणे झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक वृंद शिरीन शेख,रुबीना खान,अमिन पठाण,मोहम्मद अर्शद, वसीम खान, शहीद अहमद आदींनी प्रयत्न केले. मुख्याध्यापक जानीसर अख्तर यांनी प्रास्ताविक केले नसरुद्दीन काझी शिक्षकाने सूत्रसंचालन केले व सौ शिरीन शेख यांनी आभार मानले. कार्यक्रमाचा समारोप मौलाना अब्दुल रहमान यांच्या दुवाने करण्यात आला.