जळगाव ;- शहरातील एका परिसरातून एका १६ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना 12 ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला पालकांच्या फिर्यादींवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या एका परिसरामध्ये १५ वर्षे आठ महिन्याची अकरावीत शिक्षण घेणारी तरुणी ही कुणालाही काही न सांगता 12 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास निघून गेली. तिच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आल्याने एमआयडीसी पोलीस स्टेशनला १२ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्ती विरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पीएसआय दत्तात्रय पोटे करीत आहे.