सामाजिकजळगांव

भडगाव शहरातील मेन रोडवर अवजड वाहनांना बंदी करा अन्यथा अंदोलनाचा इशारा

अखिल भारतीय सेनेचे पोलिस निरीक्षकांना निवेदन

जळगाव l १९ जून २०२३ l भडगाव प्रतिनिधी l शहरात जुन्या गावात येण्या जाण्यासाठी मेन रोड हा एकच मुख्य रस्ता असून या मेन रोड वर शाळकरी मुले, पायी जाणारे अबाल वृद्ध, दुचाकी चारचाकी, रुग्णवाहिका शेतकऱ्यांची बैल गाडा चा वापर नेहमी असल्याने रस्त्याच्या मोधोमध अवजड वाहने, ट्रान्सपोर्ट च्या गाड्या उभ्या असतात या मुळे रस्त्यावर ट्रॅफिक जाम होते व नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी त्वरित अवजड वाहनांना बंदी करुन नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे. असे निवेदन अखिल भारतीय सेना तालुकाध्यक्ष दिनेश महाजन यांनी पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की,
भडगांव शहरात मेन रोड, सोनार गल्ली, मधे ट्रान्स्पोर्ट आवजड वाहनांना, रस्त्यात थांबतात या मुळे ट्राफिक जमा होते व शाळेतील मुले, व नागरिकांना येण्या जाण्यासाठी त्रास होतो व कधी कधी रुग्णवाहिका देखील ट्राफिकमध्ये अडकते त्यामुळे रुग्णांना नाहक त्रास होतो. यामुळे जिवीतहानी नाकारता येत नाही. तसेच अवजड वाहन धारकांना जर बाजुला सारण्यासाठी संगितले तर ते अरें रावीची ची भाषा नागरिकांना करतात. तसेच नगरपालिकेचे पाईप लाईन सुधा या अवजड वाहनांमुळे फुटले आहे. यामुळे गावाचे नुकसान होते. दुषित पाणी पाणीपुरवठा होतो. तरी आपण लवकखर अवजड वाहनांना बंदी न केल्यास तहसिल कार्यालय समोर अखिल भारतीय सेने तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल.पुढील होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहिल याची नोंद घ्यावी. असे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनाच्या प्रती तहसिलदार भडगाव, मुख्याधिकारी नगर परिषद भडगाव यांना देण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button