जळगांव

Big Breaking : आर.एल.ज्वेलर्स ग्रुपवर ईडीची मोठी कारवाई; ४० तासांनी पथक रवाना

खान्देश टाइम्स न्यूज | १८ ऑगस्ट २०२३ | देशभरात नावलौकिक असलेल्या राज लखीचंद ग्रुपच्या विविध फर्मवर गुरुवारी सक्तवसुली संचालनालय पथकाने छापे टाकले होते. दोन दिवस सुरू असलेल्या कारवाईनंतर शुक्रवारी पथकाने मोठे दस्तऐवज आणि मुद्देमाल ताब्यात घेतला.

जळगाव जिल्ह्यातील माजी खा.ईश्वरलाल जैन आणि माजी आ.मनीष जैन यांचे जळगावसह राज्यभरात राजमल लखीचंद ज्वेलर्स नावाने फर्म आहे. तसेच त्यांचे इतर देखील काही शोरुम जळगावात आहेत. गुरुवारी सकाळी सक्तवसुली संचालनालय (ED) पथकाचे २० अधिकारी १० वाहनांनी जळगावात पोहचले. पथकाने एकच वेळी सर्व ठिकाणी छापे टाकले.

पथकाने आ.मनीष जैन यांच्यासह इतर काही कर्मचारी आणि संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू केली होती. पथकाकडून इन कॅमेरा सर्व कार्यवाही केली जात होती. पथकाने फर्मचे दस्तऐवज आणि मुद्देमाल देखील हस्तगत केला होता. शुक्रवारी रात्री उशिरा पथक बाहेर पडले. स्थानिक माध्यमांशी बोलणे मात्र ईडी पथकाने टाळले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button