विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये नागपंचमी साजरी
जळगाव ;– विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडियम स्कूल, पूर्व प्राथमिक विभागात दिनांक २१ ऑगस्ट २०२३ सोमवार रोजी ” नागपंचमी” साजरी करण्यात आली. नागाचे वारूळ कसे असते हे मुलांना समजण्यासाठी शाळेच्या कला शिक्षिका सौ. रीना भोईटे यांनी पटांगणात मातीचे वारुळ तयार केले होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री. ज्ञानेश्वर वाघ सर आणि समन्वयिका सौ.सविता कुलकर्णी यांनी काही विद्यार्थ्यांसोबत नागांच्या प्रतिमेची व वारुळाची पूजा केली.
कार्यक्रम प्रमुख सौ. विद्या देसाई यांनी नागपंचमी का साजरी केली जाते, याबद्दल माहिती सांगितली. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. ज्ञानेश्वर वाघ सरांनी विद्यार्थ्यांना साप हा का शेतकऱ्याचा मित्र असतो. याबद्दल थोडक्यात सांगितले आणि सौ. सविता कुलकर्णी दीदींनी नागपंचमीनिमित्त एक छान गाणं गायलं. मधल्या सुट्टीनंतर Jr. Kg आणि Sr. Kg. च्या विद्यार्थ्यांना PPT द्वारे अनेक प्रकारचे साप दाखवण्यात आले.या कार्यक्रमातून निसर्गावर प्रेम करा , प्राणिमीत्रांवर प्रेम करा असा संदेश दिला गेला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य श्री. ज्ञानेश्वर वाघ सर आणि समन्वयिका सौ.सविता कुलकर्णी दिदी यांचे मार्गदर्शन लाभले. तर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले.