जळगांव

सर्पदंशावर डॉ.उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालयात खात्रीशीर उपचार

महात्मा ज्योतिबा फुले योजना लागू; सेवा २४ तास उपलब्ध

जळगाव l २३ ऑगस्ट २०२३ l पावसाळ्याच्या मोसमात मोठ्या प्रमाणात सर्पदंशाच्या घटना घडतात. त्यादृष्टीने डॉ.उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालयात सर्पदंशावर खात्रीशीर उपचार केले जात आहे. सर्पदंशावर तात्काळ उपचार झाल्याने रुग्णाचा जीवावरील संकट टळते, सर्पदंशाच्या रुग्णांसाठी येथे महात्मा ज्योतिबा फुले योजना लागू असून २४ तास सेवा उपलब्ध आहे.

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालयात मेडिसीन विभागाचा अतिदक्षता विभाग असून येथे २४ तास आयसीयू तज्ञ डॉक्टर्स कार्यरत आहे. सर्पदंशाच्या रुग्णास आवश्यक सर्व प्रकारची औषधी देखील येथे उपलब्ध आहे. अनेकदा विषारी सापांच्या दंशामुळे रुग्णाची प्रकृती फार खालावलेली असते अशावेळी व्हेंटीलेटर्सची आवश्यकता असल्याने येथील आयसीयूमध्ये व्हेंटीलेटर्स मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. मागील महिन्यात सर्पदंशाच्या घटनेत जखमी होवून अतिगंभीर झालेल्या रुग्णांवर डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील अतिदक्षता विभागात यशस्वी उपचार करण्यात आले. त्यामुळे रुग्णांना जीवनदान मिळाले.
उगाच वेळ वाया घालवू नका; डॉक्टरांचा सल्‍ला
अजूनही ग्रामीण भागात सर्पदंशाची घटना घडल्यावर मांत्रिकाकडून उपचार घेण्यात वेळ वाया घालवला जातो, परंतु तसे न करता थेट रुग्णालयात घेऊ्न यावे तसेच घटनेच्या ठिकाणी दंश केलेला साप मारला असेल तर त्याचे विष सोबत घेऊन यावे ज्याद्वारे डॉक्टरांना निदान व तातडीने उपचार करण्यास सोयीचे होईल. रुग्णालयात एमआयीसू तज्ञ डॉक्टर चंद्रेय्या कांते, डॉ.पूजा तन्नीरवार यांच्याद्वारे उपचार केले जात असून निवासी डॉक्टर डॉ.हेत्वी, डॉ.दिनेश, डॉ.जीवक, डॉ.हर्ष आदिंद्वारे रुग्णांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असतात. अधिक माहितीसाठी ७०८३९६६१२६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
——-
सर्प दंश झाल्यास उपाय
– सर्पदंश झालेल्या व्यक्‍तीस लवकरात लवकर रुग्णालयात न्यावे.— सर्पदंश झालेल्या व्यक्तीला मानसिक धीर द्या, त्याच्या मनातील भीती दूर करा.
– सर्प दंश झालेल्या व्यक्तीला शांत, हवेशीर ठिकाणी न्यावे. दंश झालेली जागा डेटॉल किंवा स्वच्छ पाण्याने धुऊन काढावी.
– सर्पदंश झालेल्या जागेतून रक्तस्त्राव होत असेल तर तो होऊ द्या.
– सर्प दंश झालेल्या अवयवाकडून हृदयाच्या दिशेने होणारा रक्तपुरवठा रोखण्यासाठी मध्यम दाबाने बांधावे.

सर्पदंश झालेल्या जागेतून रक्तस्त्राव होत असेल तर तो होऊ द्या.
सर्प दंश झालेल्या अवयवाकडून हृदयाच्या दिशेने होणारा रक्तपुरवठा रोखण्यासाठी मध्यम दाबाने बांधावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button