सै. नियाज अली भैय्या फाऊंडेशन तर्फे चंद्रयान 3 यशस्वी झाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा
जळगाव l २३ ऑगस्ट २०२३ l जकी अहमद l संपूर्ण भारत वर्षासाठी आज अत्यंत महत्त्वपूर्ण असा दिवस आहे. कारण की आज भारताच्या चंद्रयान 3 यशस्वी झालेला आहे. हे चंद्रयान भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संघटना इस्रो ने 14 जुलै 2023 शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजून 35 मिनिटांनी, उड्डाण केलेले होते. ते आज 23/08/2023 रोजी सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी यशस्वीरित्या पोहोचले.
म्हणून या गोष्टीचा आनंद साजरा करण्यासाठी आज सै. नियाज अली भैय्या फाऊंडेशन तर्फे भिलपूरा चौकात नागरिकांनी एकत्रित येत फटाके फोडून, एक दुसऱ्यांना मिठाई भरवून, हिंदुस्तान जिंदाबाद, जय हिंद जय भारत, नाझ है नाझ है हमे वतन पे नाज है, भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संघटना जिंदाबाद अशा विविध घोषणा देऊन परिसर दणाणून सोडण्यात आलेला होता. याप्रसंगी अयाज अली नियाज अली यांनी सांगितले की जगातील निवडक चार देशांमध्ये भारताच्या समावेश होणार आहे ही बाब सर्व भारतीयांसाठी अत्यंत अभिमान व गर्वाची आहे. या मोहिमेमुळे भारताचा प्रभाव आता जगावर वाढणार आहे. यामुळे शत्रू देशांच्या मनात धडकी भरणार आहे. आम्ही यात सामील सर्व शास्त्रज्ञ यांचा अभिनंदन करतो.
या प्रसंगी सै. अयाज अली नियाज अली, डॉ. परिमल मुजुमदार, हाजी सिराजुद्दीन, अब्दुल वहाब, शफी ठेकेदार, नाझीम पेंटर, योगेश मराठे, शकूर बादशहा, रवींद्र खैरनार, हाजी रऊफ खान , असलम नागोरी,सैयद उमर, कामील खान, जाफर खान, शेख मुजफ्फर मास्टर, नुरा मास्टर, उमेश कोळी, सलीम कुरेशी, मोईन अली, सुधाकर मिस्तरी, शेख मोहम्मद इत्यादी उपस्थित होते.