खान्देशजळगांवशिक्षणसामाजिक

शेंदुर्णी शिक्षण संस्थेच्या संचालिका उज्वलाताई काशीद यांच्याकडून  विद्यार्थ्यांना शालेय बुटांचे वाटप–

शेंदुर्णी-ता.जामनेर, 
धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप सोसायटी लि. शेंदुर्णी द्वारा संचलित आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी तालुका जामनेर या विद्यालयाच्या पटांगणावर संस्थेच्या संचालिका सौ. उज्वलाताई काशीद यांनी लो त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इ ५वी ते ७ वी च्या गरीब गरजू होतकरू विद्यार्थ्यांना २००शालेय बुटांचे वाटप केले.
गरुड विद्यालयामध्ये शालेय अभ्यासक्रमाबरोबरच शालेय शिस्तीचे देखील काटेकोरपणे पालन केले जाते यामध्ये शालेय गणवेश त्यावर टाय ,लोबो, काळे शूज आणि पांढरे मोजे रेगुलर अत्यंत आवश्यक असतात. संचालिका सौ.उज्वलाताई काशीद यांनी शाळेला भेट दिली असता त्यांच्या असे लक्षात आले की काही गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या पायात बूट नाहीत म्हणून त्यांनी अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने २०० बुटांचे वितरण केले. तसेच एक नोव्हेंबर रोजी पोतदार जीनियस इंटरनॅशनल स्कूल जामनेर या ठिकाणी तालुकास्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते त्यामध्ये गरुड विद्यालयातील १४ वर्षे वयोगटाच्या संघातील विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक आर .एम .सपकाळे यांचे अभिनंदन केले. तसेच संस्थेचे सचिव सतीश चंद्र काशीद यांनी अध्यक्ष भाषणात विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शालेय शिस्त सांभाळण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे सचिव सतिष चंद्र काशीद यांनी स्वीकारले. कार्यक्रमाचे प्रास्थाविक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. पी. उदार यांनी केले. सूत्रसंचालन उपशिक्षक डी एस वारांगणे तर आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक एस व्ही शिंदे यांनी केले.
या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे सचिव सतीश चंद्र काशीद, संचालिका सौ. उज्वलाताई काशीद, विद्यालयाचे मुख्याध्यापक एस .पी .उदार उपमुख्याध्यापक एस .व्ही .शिंदे पर्यवेक्षक जे .एस. जुमडे व व्ही .व्ही .पाटील विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button