खान्देशजळगांवसामाजिक

जैन संघटनेचे भारताच्या विकासात योगदान- जिल्हाधिकारी

जळगाव:-भारतीय जैन संघटना ही खुप नियोजन करून प्रश्न सोडविते. आपल्याजवळ असलेला मनुष्यबळ, संसाधने याचा विचार करून पुढे जाते. भारताच्या विकासात संघटनेचे योगदान मोठे आहे असे प्रतिपादन जळगाव जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. भारतीय जैन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात रविवारी ३ सप्टेंबर रोजी दुसरे राज्यस्तरीय सभेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्तविक राज्य उपाध्यक्ष विनय पारख यांनी केले.

जिल्हा अधिकारी पुढे म्हणाले, कोरोना काळात कोविड मुक्त गाव साठी जैन संघटनेचे योगदान मोठे आहे. १ हजार ३८५ ग्रामपंचायत होती. पैकी ३८ ग्राम पंचायतीत एक ही कोविड पेशंट मिळाला नाही. तसेच ६०० ग्रामपंचायतीत केवळ १० रूग्ण होते. त्यामुळे ऊर्जा निर्माण झाली. स्कुल एक्रीडेशन मधे संघटनेने मोठे काम केले आहे. गुजराथ सरकारने 2010-11मधे ते स्विकारले नंतर गोवा सरकारने व आता निती आयोग इतरत्र स्विकारत आहे.पाण्याच्या बाबतीत संघटनेचे अविस्मरणीय कार्य आहे.बीजेएस कडून अजुन खुप अपेक्षा आहे.

उद्योजक अशोक जैन म्हणाले, मी मूल्यवर्धन शिक्षण साठी जळगाव जिल्ह्यात सोबत कार्य केले आहे. शांतीलाल मुथा यांचे खुप मोठे कार्य आहे. त्यांचा पद्मश्री पुरस्कारसाठी प्रस्ताव आपण पाठविले पाहिजे.पाण्यासाठी जे ही योगदान लागेल ते मी व जैन उद्योग देण्यास तयार आहे. कर्यक्रम दरम्यान पश्चिम महाराष्ट्रचे सचिव अमृत पारख यांची कन्या राशी पारख सी.एस. परीक्षेत सम्पूर्ण भारतात प्रथम आल्याबद्द्ल संघटनेच्या वतीने मोमेंडो देऊन सत्कार करण्यात आला.

प्रमुख अतिथि व संघटनेचे माजी विश्वस्त एड. प्रकाश सुराणा म्हणाले,चाळीस वर्षात बीजेएसच्या कार्यात मुलभूत बदल झाले.पूर्वी संघटनेकडून पाणपोई उघडल्या जात, आता पूर्ण भारतात 100जिल्हे जल पर्याप्त साठी घेतले आहे. हा बदल आहे. हा इतिहास पाहता कार्यकर्त्यांनी कार्य केले पाहिजे.

राज्य अध्यक्ष नंदकिशोर सांखला यांनी वर्षभरात संघटनेचे करावयाची कार्याची माहिती दिली. राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य केतन शाह, राज्य सचिव दीपक चोपडा, राज्य उपाध्यक्ष महेंद्र मंडलेचा, कांचनमाला सांगवे व्यासपीठावर उपस्थित होते.पूर्ण महाराष्ट्रातील राज्य कार्यकारिणी सदस्य, विभागीय पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष, जिल्हा सचिव उपस्थित होते. सूत्र संचालन पुष्पा भंडारी तर आभार प्रदर्शन विभाग अध्यक्ष अशोक श्रीश्रीमाळ यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button