खान्देश टाइम्स न्यूज | ९ सप्टेंबर २०२३ | जळगाव शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या दि.१० रोजी येणार असून त्यांचा दौरा निश्चित झाल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या सकाळी खाजगी विमानाने १०.३० वाजता ते जळगावात येणार असून दुपारी २.३० वाजता पुन्हा परतणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत मिलींद नार्वेकर असणार आहेत.
जळगाव शहर मनपा इमारत आवारात उभारण्यात आलेल्या लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्याचे अनावरण आणि पिंप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे अनावरण करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे उद्या दि.१० सप्टेंबर रोजी जळगावात येणार आहेत. पुतळा आणि स्मारकाच्या अनावरण करण्यावरून शहरात मोठे राजकारण पेटले असून राजशिष्टाचारचा मुद्दा पुढे केला जात आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौरा निश्चित झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्धव ठाकरे व मिलींद नार्वेकर हे उद्या सकाळी ९.३० वाजता खाजगी विमानाने मुंबईहून निघणार असून १०.३० वाजता जळगाव विमानतळावर पोहचतील. ११ वाजता जळगाव मनपा प्रांगणात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर ते पिंप्राळा येथे रवाना होतील.
१२.१५ वाजता पिंप्राळा येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे अनावरण कार्यक्रमाला पोहचणार आहेत. १२.४५ वाजता ते कमल विहार सोसायटी, पिंप्राळा येथे राखीव वेळ आहे. १ वाजता ते जाहीर सभेला संबोधित करणार असून त्यानंतर २.३० वाजता विमानतळाच्या दिशेने रवाना होणार आहेत.