खान्देशगुन्हेजळगांव

खेडी शिवारातील घरफोडीचा उलगडा

खेडी शिवारातील घरफोडीचा उलगडा
एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई; ४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

जळगाव – खेडी शिवारातील शिवनगर परिसरातील शंभू रेसिडेंसीमधील घरफोडी प्रकरणाचा छडा एमआयडीसी पोलिसांनी लावला आहे. दोन अट्टल चोरट्यांना अटक करून सुमारे ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

१३ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास फ्लॅट क्रमांक ४ मधून अज्ञात चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने लंपास केले होते. रवींद्र मगरे यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५(अ), ३३१(३), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल तायडे यांच्या पथकाने तपास सुरू केला. ३१ जुलै रोजी सोनगीर (धुळे) येथील कैलास चिंतामण मोरे आणि जयप्रकाश राजाराम यादव यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

चौकशीत आरोपी कैलास मोरेने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या सांगण्यावरून पोलिसांनी सोनगीर येथील त्याच्या घरातून ३,८१,५१४ रुपये किमतीची ३८.९३० ग्रॅम सोन्याची लगड आणि १५,६८५ रुपये किमतीचे १३५ ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण ३,९७,१९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

कारवाईत सहायक फौजदार विजयसिंग पाटील, हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील, कॉन्स्टेबल निलेश पाटील, विशाल कोळी आणि राहुल रगडे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास उपनिरीक्षक राहुल तायडे व कॉन्स्टेबल निलेश पाटील करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button