
जळगाव (प्रतिनिधी) – गणेशोत्सवानंतर जळगाव जिल्ह्यातील सुवर्ण बाजारात सोन्या-चांदीचे दर आज स्थिर राहिले आहेत. भंगाळे गोल्ड या प्रसिद्ध दालनाने दिलेल्या माहितीनुसार, आज सोने आणि चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. यामुळे खरेदीदार आणि गुंतवणूकदार दोघेही शांतपणे बाजाराचे निरीक्षण करत आहेत.
आजचे दर २२ कॅरेट सोने: प्रति तोळा ₹१,००,४८५ , २४ कॅरेट शुद्ध सोने: प्रति तोळा ₹१,०९,७०० , चांदी: प्रति किलो ₹१,२५,०००
गेल्या काही दिवसांपासून गणेशोत्सवामुळे सोन्याचे भाव वाढले होते, मात्र आज ते स्थिर असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. भंगाळे गोल्ड हे आकर्षक डिझाईन्स, उत्तम ऑफर्स आणि पारदर्शक व्यवहारांमुळे जळगाव आणि सावदा येथील ग्राहकांसाठी एक विश्वसनीय ठिकाण बनले आहे.





