गुन्हे

आरटीओ एजंटच्या सामानाची तोडफोड !

खान्देश टाइम्स न्यूज | १६ सप्टेंबर २०२३ | जळगाव शहरातील प्रादेशिक परिवहन विभाग कार्यालय समोर स्टॉल लावणाऱ्या एजंटच्या सामानाची तोडफोड केल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री घडला.

खोटेनगर परिसरात राहणारे सुलतान बेग नजीर बेग मिर्झा हे एक आरटीओ एजंट आहेत. प्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयासमोरील मोकळ्या जागी टेबल, खुर्ची टाकून ते आपला व्यवसाय करतात. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी त्यांच्या सामानाची तोडफोड केली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button