जळगाव ;-दोन वर्षात आठ पट रक्कम देण्याचे अमिष दाखवत सुवर्णा संभाजी पवार (४५, रा. कुंभारवाडा, पिंप्राळा, जळगाव ) या महिलेची ७ लाख १० हजार ५२८ रुपयांमध्ये सुरत येथील तिघांनी फसवणूक केली. गुतंवणूक केल्यानंतर दोन वर्षात आठ पट रक्कम देण्याचे सांगितले मात्र आता तीन वर्ष उलटले तरीदेखील वाढीव रक्कम मिळाली तर नाहीच उलट मुद्दलही हातची गेल्याने या महिलेने रामानंद नगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
ऑनलाईन पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे लाखो रुपयांमध्ये फसवणुकीचे प्रकार वाढत असून आता पुन्हा एका महिलेचीदेखील फसवणूक करण्यात आली. पिंप्राळा परिसरातील सुवर्णा पवार या गृहीणीशी सुरत येथील केवीन ब्रम्ह भंटट, जिग्ना, जनकभाई (पूर्ण नाव समजू शकले
त्यांना एका योजनेत आयडी तयार करुन त्यात पैसे भरण्यास सांगितले. जेवढी रक्कम भरली त्याच्या आठ पट रक्कम दोन वर्षात दिली जाईल, असेही त्या महिलेला सांगण्यात आले. त्यानुसार या महिलेने १ जुलै २०२० ते ३१ जुलै २०२० या दरम्यान वेगवेगळ्या आयडीवर रक्कम भरली. बोली केलेल्या दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी अर्थात तीन वर्षे झाली तरी या महिलेला भरलेल्या रकमेच्या आठ पट रक्कम मिळाली तर नाहीच उलट मुद्दल सात लाख १० हजार ५२८ रुपयेदेखील हातचे गेले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सदर महिलेने रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून वरील प्रकारे नावे सांगण्याऱ्या तिघांविरुद्ध १८ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील करीत आहेत.