गुन्हेजळगांव

मोठी कारवाई : जळगावातील अट्टल गुन्हेगार ‘बब्ब्या’ स्थानबद्ध

खान्देश टाइम्स न्यूज | ३० सप्टेंबर २०२३ | जळगाव शहरात एकाच दिवशी ४ गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यात आले असून ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. रामानंद नगर पोलीस ठाणे हद्दीतील तिघे तर एक एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार आहे. संतोष उर्फ बब्ब्या सुभाष राऊत असे त्याचे नाव आहे.

श्रीगणेशोत्सव विसर्जन मुहूतावर जळगाव जिल्हयांतील जळगाव शहरातील एमआयडीसी व रामानंदनगर पोलीस स्टेशन रेकॉर्ड वरील ४ गुन्हेगारांवर एम. पी. डी. ए. कायदयाअंतर्गत मोठी कारवाई करण्यात आलेली आहे.

एमआयडीसी पो. स्टे. हद्दीतील संतोष ऊर्फ बब्या सुभाष राऊत (कोळी) वय २४ रा. आयटीआय जवळ, कुसूंबा, ता. जि. जळगांव याचे विरुध्द ९ गुन्हे दाखल असून त्यात अनेक गंभीर स्वरूपाचे आहेत.

स्थानबध्द इसमाचा महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले व औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विना परवाना प्रदर्शन व्यक्ती (व्हिडीओ पायरेट) वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबतचा अधिनियम १९८१ (महाराष्ट्र राज्य कायदा क्रमांक – ५५ सन १९८१) सुधारणा अधिनियम २०१५ अन्वये “हातभट्टीवाला” या संज्ञेत प्रस्ताव तयार करण्यात आला होता. एमआयडीसी पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोउनि दिपक जगदाळे, सफौ अतुल वंजारी, पोहेकॉ गफ्फार तडवी, पोना सचिन पाटील, योगेश बारी, साईनाथ मुंडे, संदिप धनगर यांनी तयार करून हा प्रस्ताव हा स्था.गु.शा. जळगाव येथे सादर केला.

प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर जिल्हाधिकारी जळगाव यांचे कडेस सादर करण्यात आला होता. त्यानुसार दि.२९ रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्थानबध्द आदेश पारीत केला आहे. सदर इसमास एमआयडीसी पो.स्टे. चे
पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोउनि दिपक जगदाळे, पोउनि रविद्र गिरासे, अतुल वंजारी, पोना/सचिन पाटील, पोना/ योगेश बारी, पोना. योगेश बारी, पोना इम्रान सैय्यद, पोना सुधीर सावळे, विशाल कोळी, राहुल रगडे, मपोकॉ हसिना तडवी अशांनी स्थानबध्द इसमास ताब्यात घेवून मध्यवर्ती कारागृह, औरंगाबाद जिल्हा औरंगाबाद येथे दाखल करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button