खान्देशगुन्हेजळगांव

भुसावळात युवकावर विळ्याने वार

भुसावळ;- शहरातील गंगाराम प्लॉट येथील तरुणांवर विळ्याने हल्ला केल्याची घटना शनिवार रोजी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान घडली. संशयितांने फिर्यादीच्या आईस त्यांच्या राहत्या घरासमोर शिवीगाळ केली. याबाबत गौरव नाले याने माझ्या आईस शिवीगाळ का केली? या बाबत विचारणा केली असता संशयित आरोपी प्रशांत चौधरी याने त्याच्या घरात जाऊन विळा आणला व फिर्यादीच्या पाठीवर एक बार करीत जखमी केले. गौरव सुनील नाले याने दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button