कासोदा – तालुक्यातील उत्राण शिवारात शेतातून सायंकाळी घरी परतणाऱ्या गृहिणीची चौघांनी अश्लील वर्तन करून तिला शिवीगाळ करीत अश्लील हाव करून विनयभंग केल्याचा प्रकार ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडला याप्रकरणी गृहिणीने कासोदा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उतरण शिवारात ३ ऑक्टोबर रोजी एक ४० वर्षीय गृहिणी महिला परतत असताना गावातील मारुती मंदिराजवळ संशयित आरोपी भागवत भिकन पाटील, नाना भिकन पाटील ,भाऊसाहेब भिकन पाटील, आणि दिलीप काशिनाथ पाटील हे उभे असताना त्यांनी महिलेस शिवीगाळ करून असली संभाषण द्वारे तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून कासोदा पोलीस स्टेशनला चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक फौजदार रवींद्र पाटील तपास करीत आहे.