खान्देशगुन्हेजळगांव

बायोडिझेलची अवैधपणे वाहतूक ; दोन टँकर जप्त

एमआयडीसी पोलिसांची कारवाई

बायोडिझेलची अवैधपणे वाहतूक ; दोन टँकर जप्त
एमआयडीसी पोलिसांची कारवाई
जळगाव प्रतिनिधी

बायोझिडेलची शहरातून अवैधपणे वाहतुक करणाऱ्या दोन टैंकचर एमआयडीसी पोलीसांच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास अजिंठा चौफुलीवर कारवाई करीत जप्त केले, या कारवाईत २७ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला टैंकर चालकांसह मालकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

अजिंठा चौफुली येथून संशयास्पदरित्या जाणारे दोन ट्रैकर पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांच्यासह पोलीस पथक मंगळवारी मध्यरात्री २ वाजता गस्तीवर असताना पोलिसांनी थांबविले . त्यावेळी चालकांची चौकशी केली असता दोघांकडून कुठलीही माहिती मिळाली नाही . दरम्यान पोलिसांनी खाक्या दाखविला असता केली दोन्ही ट्रॅकरमध्ये बायोडिझेलभरल्याचे त्यांनी काबुल केले. . दरम्यान पोलिसांनी टैंकर क्रमांक (जीजे १२ बीटी ११८१) आणि (जेजे १२ बीटी ४२८४) अशी दोन्ही चाहने हे एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

पोलिसांनी आणलेल्या टँकरचा पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करुन त्यांचे सॅम्पल तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, या दोन्ही वाहनांमध्ये मिळून एकूण २७ लाख रुपये किमतीचे बायोडिझेल असल्याचे उघडकीला आले.

याप्रकरणी पोलीस नाईक विकास सातदिवे आणि सिद्धेश्वर डापकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहन बालक सद्दाम सय्यद अकबर (वय २३, रा.बच्छाव राज्य गुजरात) आणि लतीफ भाई फकीर मोहम्मद हिंगोरजा (वय २४, रा. आईचार जि. कच्छ राज्य गुजरात) यांच्यासह टँकरचे मालक ज्ञानेश्वर भारत शेजोळे (वय २९, रा.उफडी ता. बुलढाणा) आणि सुलेमान इलियास हेरेया (रा. वरसाना कच्छ राज्य गुजरात) या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button