चाळीसगांव :-चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी आज सकाळी गस्त घालत असताना त्यांना एक वाहन संशयास्पद आढळून आल्याने त्यांनी पाठलाग केला असता कारचालक हा पळून गेला मात्र वाहनाची तपासणी केली असता यामध्ये सुमारे 18 लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ असलेले अफूची बोंडे व चुरा असा मुद्देमाल आढळून आला याबाबत चाळीसगाव पोलीस स्टेशनला कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,आज रोजी पोलीस उपनिरीक्षक, सुहास आव्हाड, वाहनाने करीत असतांना त्यांना चाळीसगांव शहरातील कोतकर कॉलेज जवळ सकाळी 05.45 वाजता एक पांढऱ्या रंगाची, हुंडाई कार क्रमांक MP 09 WC 1485 हिच्यावर संशय बळावल्याने कार चालकास थांबण्याचा इशारा दिला असता त्याने इशाऱ्यास न जुमानता भरदाव वेगाने कार नेली ..गस्तीवरील अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ एकमेकांना संपर्क करून चाळीसगाव शहरातील मुख्य रस्त्यावर येऊन कार अडवण्याचा प्रयत्न केला..सदर वाहन चालक यास पळून जाण्यासाठी मार्ग न मिळाल्याने तो सदरचे वाहन रेल्वे स्टेशन जवळील मालधक्का जवळ वाहन सोडून पळून गेला ..कारच्या चालकाच्या बाजुस असलेल्या मागील दरवाजाच्या फुटलेल्या काच मधुन पाहीले असता नमुद कारमध्ये गोण्या व गोण्यांच्या बाजुला अफुची बोंडे व बोंडाचा चुरा पडलेला दिसत असल्याची खबर दिल्याने पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना माहिती देऊन ते हजर होताच मा. सहा. पोलीस अधिक्षक सो. श्री अभयसिंह देशमुख यांची लेखी परवानगी घेवुन, तसेच लागलीच पोलीसांनी दोन शासकीय पंच, वजन मापे निरीक्षक, असे पोलीस स्टेशनला बोलावून पोलीसांचे एक पथक तयार करुन, सदर कार मधील मुद्देमालाची पाहणी केली असता त्यात 1 क्विंटल, 80 किलो, 240 ग्रँम वजनाच्या 18,02,400/- रुपये किमतीच्या एकुण 09 गोण्या त्यामध्ये अफुची बोंडे व बोंडाचा चुरा (अमली पदार्थ) तसेच 10,00,000/- रुपये किमतीची एक पांढऱ्या रंगाची, हुंडाई कंपनीची, क्रेटा कार क्रमांक MP 09 WC 1485 असा एकुण 28,02,400/- रुपये किमतीचा मुद्देमाल पोलीसांनी शासकिय पंचासमक्ष जप्त करुन ताब्यात घेतला आहे. नमुद कारचालका विरुध्द चाळीसगांव शहर पो.स्टे. गुरनं. 478/2023 एन.डी.पी.एस. ॲक्ट 1885 चे कलम 18(ख) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक, संदीप पाटील तसेच सपोनि/सागर ढिकले, पोउपनि/सुहास आव्हाड, पोउपनि/योगेश माळी, चालक पोहेकॉ/नितीन वाल्हे, पोहेकॉ/राहुल भिमराव सोनवणे, विनोद भोई, सुभाष घोडेस्वार, पंढरीनाथ पवार, पोना/महेंद्र पाटील, भुषण पाटील, तुकाराम चव्हाण, दिपक प्रभाकर पाटील, पोकॉ/ज्ञानेश्वर पाटोळे, विजय पाटील, पवन पाटील, आशुतोष सोनवणे, समाधान पाटील, रविंद्र बच्छे, राकेश महाजन, ज्ञानेश्वर गिते, विनोद खैरनार, निलेश पाटील, शरद पाटील, प्रविण जाधव, संदीप पाटील सर्व. नेम चाळीसगांव शहर पो.स्टे. तसेच फोटोग्राफर अनिकेत चंद्रशेखर जाधव, वजन मापाडी वजन मापाडी अक्तर युनुस छुटाणी रा. चाळीसगांव व पंच संजय धोंडु चव्हाण, विनोद कृष्णा मेन यांनी संयुक्त अभियान राबवुन केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास PSI सुहास आव्हाड व पोहेकॉ/विनोद भोई, पोकॉ/उज्वलकुमार म्हस्के नेम. चाळीसगांव शहर पो.स्टे. हे करीत आहेत.