महाराष्ट्रगुन्हे

50 कोटी रुपयांची लॉटरी लागल्याचे आमिष ; तरुणाला ७ लाखांचा गंडा

नाशिक ;– 50 कोटी रुपयांची लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या चार्जेसच्या बहाण्याने एका सायबर भामट्याने तरुणास 7 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की हुल मुरलीधर मंडलिक (वय 32, रा. सावरकर चौक, सिडको) हा तरुण खासगी नोकरी करतो. मंडलिक हा दि. 13 फेब्रुवारी रोजी घरी असताना अज्ञात टेलिग्रामवरील आय. डी. धारकाने त्याच्याशी संपर्क साधला व 50 कोटी रुपयांची लॉटरी लागल्याचे आमिष दाखविले.

त्यानंतर अज्ञात इसमाने मंडलिक यांना 50 कोटी रुपयांची लॉटरी लागली असून, त्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या चार्जेसचा बहाणा केला. 50 कोटी रुपयांची लॉटरी मिळावी, यासाठी मंडलिक यांनी आरोपीने सांगितलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, येस बँकेच्या खात्यांवर, तसेच गुगल पे यूपीआयधारक इसमाच्या खात्यावर त्यांनी दि. 13 फेब्रुवारी ते 13 मे 2023 या कालावधीत वेळोवेळी एकूण 7 लाख 7 हजार 594 रुपये 83 पैसे जमा केले; मात्र एवढी रक्कम भरूनही 50 कोटी रुपयांची लॉटरी मिळाली नाही. याबाबत फिर्यादी मंडलिक यांनी विचारणा केली असता संबंधित क्रमांकावर संपर्क होऊ शकला नाही.

त्यामुळे फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर फिर्यादी राहुल मंडलिक यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून अज्ञात संशयिताविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button