पत्रकार आबिद शेख यांना राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२५ जाहिर

पत्रकार आबिद शेख यांना राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२५ जाहिर
अमळनेर: फैज़ान शेख I ए.डी. फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने दिला जाणारा “भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय गौरव पुरस्कार – २०२५” यंदा अमळनेर येथील प्रख्यात पत्रकार आबिद शेख यांना जाहीर झाला आहे.
श्री. आबिद शेख यांनी समाजकारण आणि पत्रकारिता क्षेत्रात केलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय असून, त्यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेत त्यांना राष्ट्रीय समाजभूषण/जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.
पुरस्कार जाहीर करताना आयोजकांनी म्हटले की, “आबिद शेख यांचे कार्य सामाजिक जाणिवा जागवणारे, प्रेरणादायी आणि सत्याच्या मार्गावर चालणारे आहे.
त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व त्यांच्या पत्रकारितेत प्रतिबिंबित होते आणि ते नव्या पिढीला दिशा देणारे व्यक्तिमत्त्व ठरले आहेत.”
हा राष्ट्रीय सन्मान केवळ श्री. आबिद शेख यांच्याच कार्यक्षमतेचे नाही, तर अमळनेरसारख्या शहराच्या सामाजिक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील योगदानाचेही गौरवचिन्ह ठरले आहे





