जळगाव:- जिल्हयांत टोळीने गुन्हे करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांवर हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या प्रस्तावानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी चौकशी करून त्यांना जिल्हयांतून हद्दपार करण्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, एमआयडीसी पो.स्टे. कडील हद्दपार प्रस्ताव क्र. ०३ /२०२३ प्रमाणे आशुतोष उर्फ आशु सुरेश मोरे वय २२ रा एकनाथ नगर रामेश्वर कॉलनी जळगांव (टोळी सदस्य), दिक्षांत उर्फ दादु देवीदास सपकाळे वय १९ रा. यादव देवचंद हायस्कुल जवळ मेहरुण जळगांव (टोळी सदस्य) यांचे विरुद्ध एमआयडीसी पो.स्टे. ,शनि पेठ पोलीस स्टेशनला दरोड्याचा प्रयत्न, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, घातक हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरूपाचे आठ गुन्हे दाखल आहेत.
दोघांच्या हद्दपार प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी
केलेली आहे. दोन्ही गुन्हेगारांनी टोळीने राहुन जळगाव शहरात जिल्हयांत ठिक ठिकाणी दहशत माजवली असल्याने याबाबत नागरिकांमध्ये भिती निर्माण होऊन नागरिकांचे जिवीतास व जंगम मालमत्तेस धोका निर्माण झालेला आहे. त्यांना जळगाव जिल्हयांतील सार्वजनीक शांतता सुव्यवस्था अबाधीत ठेवण्याबाबत त्यांचे विरुध्द वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन सुध्दा त्यांच्या वागणुकीत सुधारणा झालेली नाही, दोघांच्या हद्दपारचा प्रस्ताव हा एमआयडीसी पो.स्टे. चे पो. निरी. जयपाल हिरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोना/सचिन पाटील, योगेश बारी, इमरान सैय्यद, सुधीर साबळे निलोफर सय्यद साईनाथ मुंडे, जमील शेख, इम्तियाज खान यांनी तयार करुन पोलीस अधीक्षक, यम राजकुमार यांचे कडेस सादर केला होता. मा. श्री. एम. राज कुमार, पोलीस अधीक्षक यांनी प्रस्तावाचे चौकशी अंती दोघांना २ वर्षा करीता जळगाव जिल्हयांच्या हद्दीतुन हदपार आदेश पारित केलेले आहे. हदपार प्रस्तावाचे कामकाज पो. निरी. स्थानिक गुन्हे शाखा किसन नजनपाटील, जळगाव यांनी व त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे यांनी पाहिले आहे.