खान्देशगुन्हेजळगांव

बनावट सोशल मीडिया खाते उघडून फोटो व व्हिडिओ व्हायरल ; गुन्हा दाखल

जळगाव:- तालुक्यातील असोदा गावात राहणाऱ्या एका महिलेच्या नाव वापरून बनावट इंस्टाग्राम खाते उघडून त्यात महिलेच्या मुलीचे एडिट केलेले फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी केल्याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,तालुक्यातील असोदा येथे 42 वर्षीय विवाहिता राहत असून 11 सप्टेंबर ते आजपावेतो एका अनोळखी व्यक्तीने बनावट इंस्टाग्राम खाते व फेसबुक खाते तयार करून या दोन्ही खात्यांना महिलेचे नाव वापरून तिच्या मुलीचे एडिट केलेले फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केल्याचा प्रकार घडला.याप्रकरणी महिलेने सायबर पोलीस स्टेशनला धाव घेऊन अनोळखी व्यक्तीविरुद्ध 19 रोजी सुपारी 3 वाजता गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button