जळगाव ;- एका तरुणाला जळगाव रेल्वे स्टेशनवरील रिक्षा स्टॉप जवळ बेदम मारहाण करून एक लाखांची सोन्याची चैन लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतसूत्रांची दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे भूषण हिरालाल चौधरी (वय-३१) हा तरूण आपल्या परिवारासह राहत असून आपला उदरनिर्वाह करतो. बुधवारी २५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास कामाच्या निमित्ताने जळगाव रेल्वेस्थानकासमोरील रिक्षा स्टॉप येथे आलेला होता. त्यावेळी चेतन दिलीप येवले आणि अविनाश विजय रंधे यांनी कारण नसतांना भूषण चौधरी याला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली.
त्यानंतर त्यांच्या गळ्यातील ९७ हजार रूपये किंमतीची तीन तोळ्याचे सोन्याची चैन जबरी हिसकावून पसार झाले. हा प्रकार घडल्यानंतर भूषणने जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी चेतन दिलीप येवले आणि अविनाश विजय रंधे दोन्ही रा. नशिराबाद ता.जि.जळगाव यांच्या विरोधात जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि बशिर तडवी करीत आहे.