खान्देशगुन्हे

जिल्ह्यातील दोन अट्टल गुन्हेगारांवर जिल्हाधिकाऱ्यांची स्थानबद्धतेची कारवाई

जळगाव ;- जिल्ह्यातील दोन अट्टल गुन्हेगारांना जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी एमपीडीए कायद्याच्या अंतर्गत स्थानबध्द केले आहे.
जळगाव ;- गेल्या काही दिवसांपासून अनेक सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीसह एमपीडीए कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी पुन्हा एकदा गुन्हेगारांना दणका देत दोघांना स्थानबध्द केले आहे. यातील प्रकाश चंद्रकांत कंजर ( वय ३४, रा. खंडेराव नगर, जळगाव) हा अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करत असून त्यांच्यावर आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला एक वर्षासाठी ठाणे येथील कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे.

यासोबत, सोनू रामेश्‍वर पांडे (वय २४ रा. मामाजी टॉजीक मागे, भुसावळ ) याच्यावर आर्म ऍक्टसह एकूण सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामुळे त्याला पुणे येथील कारागृहात एक वर्षासाठी स्थानबध्द करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button