खान्देशगुन्हेजळगांव

दोन लाखांसाठी विवाहितेचा छळ

जळगाव := दोन लाखांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ होत असल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील शनीपेठ परिसरात माहेर असलेल्या भाग्यश्री उर्फ भूमिका अरूण बाविस्कर (व्य २४) यांचा विवाह नंदूरबार येथील अरूण आनंदा बाविस्कर यांच्याशी झालेला आहे. लग्नाचे सुरुवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पती अरूण बाविस्कर यांनी विवाहितचा किरकोळ कारणावरून शारिरीक व मानसिक छळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर तिच्याकडे माहेरहून २ लाख रुपये आणण्याची मागणी करत शिवीगाळ व मारहाण केली. शिवाय सासू, सासरे, मोठा दीर, मोठी जाऊ यांनीही पैशांसाठी तगादा लावला. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आली.

त्यानंतर बुधवारी तिने शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून पोलिसानी पती अरूण आनंदा बाविस्कर, सासू सुशीलाबाई आनंदा बाविस्कर, सासरे आनंदाच बाविस्कर, ज्ञानेश्वर आनंदा बाविस्कर आणि ज्योती ज्ञानेश्वर बाविस्कर (सर्व रा. नंदुरबार) यांच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार इंदल जाधव करीत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button