
आकाश भावसार खून प्रकरणातील पाचव्या आरोपीला अटक
जळगाव: कालंका माता चौकात आकाश पंडित भावसार (वय २७, रा. अशोक नगर) याच्या खूनप्रकरणी पोलिसांनी आणखी एका संशयिताला अटक केली. सोमवारी (५ मे) कुणाल उर्फ चौधरी (वय २३, रा. कासमवाडी) याला ताब्यात घेतले. यासह या प्रकरणातील अटक संशयितांची संख्या पाच झाली आहे.यापूर्वी रविवारी चार संशयितांना अटक झाली होती. यात अजय मंगेश मोरे (वय २८) आणि चेतन रवींद्र सोनार (वय २३, दोघेही रा. कासमवाडी) यांना १३ मे २०२५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली गेली, तर दोन अल्पवयीन संशयितांना बालसुधारगृहात पाठवले गेले