देश-विदेशअपघातखान्देशगुन्हे

ड्रायव्हरला डुलकी लागल्याने झाला असावा अपघात – गिरीश महाजन

मृतकांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर

बुलढाणा ;- बुलढाण्यात प्रवासी बसचा भीषण अपघातसमृद्धी महामार्गावर झाला असून अपघातात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बसने पेट घेतल्याने या प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे.या घटनेची माहिती मिळताच भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीष महाजन यांनी अपघात स्थळाची पाहणी केली. तसेच जखमींची विचारपूस केली.. अपघातातील मृतकांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली.

याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ना. गिरीश महाजन म्हणाले की, “ड्रायव्हरला झोप आल्याने अपघात झाला असावा, यामुळे बस पोलवर जाऊन आदळली, असे आम्हाला समजते आहे. परंतू, ड्रायव्हरचे म्हणणे आहे की टायर फुटला आहे. याचा तपास केला जाणार आहे. कारण रस्त्यावर कुठेही टायर फुटल्याचे किंवा घसरल्याचे पट्टे दिसत नाहीत. यामुळे क्लिअरकट ड्रायव्हरला झोप लागली आणि बस पोलावर आदळल्याचे दिसत आहे. या अपघातात ड्रायव्हर, कंडक्टर यांना साधे खरचटलेलेही नाही.”पुढे ते म्हणाले, “वेग देखील अपघाताचे कारण असून . रस्ता चांगला आहे, परंतू वेगावर नियंत्रण आणायला हवे. यासाठी चालकांचे काऊंसेलिंग करावे लागणार आहे. १८०-२०० च्या वेगाने गाडी चालविणे धोक्याचे आहे. यामुळे अपघात होणारच. हे अपघात कसे रोखले जाईल यावर काम केले जाईल. ड्रायव्हर, कंडक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली जाणार आहे.” या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पाहणी करणार आहेत.

दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळील समृद्धी महामार्गावरुन विदर्भ ट्रॅव्हल्सची MH 29 BE – 1819 क्रमांकाची ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. यादरम्यान मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. हा अपघात इतका भयानक होता की, मृतदेहाची ओळख पटणेही अवघड आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button