जळगाव : – दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त सोमवार, 30 रोजी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात कर्मचार्यांना शपथ देण्यात आली.
केंद्रीय दक्षता आयोगाने याबाबत सूचना दिल्या असून 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहानिमित्त राज्यातील सहकारी संस्था, सरकारी कार्यालयांत जनजागृतीपर उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. सोमवार, 30 ऑक्टोबर रोजी जळगावातील एसीबी कार्यालयात भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेण्यात आली.
यावेळी जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख, पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, दिनेशसिंग पाटील, रवींद्र घुगे, प्रदीप पोळ किशोर महाजन, सुनील वानखेडे, राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी, प्रणेश ठाकूर आदींची उपस्थिती होती.
शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांत भ्रष्टाचाराच्या दुष्पपरीणामांची माहिती देण्यासाठी चर्चासत्रे, निबंध स्पर्धा होणार आहेत. या मोहिमेत नागरीकांनी सहभागी व्हावे, यासाठी आवाहन करण्यात आले आहे.