सर्वांसाठी हेल्थ इन्श्युरन्स का महत्वाचा आहे?, जाणून घ्या..
खान्देश टाईम्स न्यूज | १ नोव्हेंबर २०२३ | जीवनशैलीतील बदलांमुळे निर्माण होणाऱ्या आजारांमुळे आपल्यापैकी बहुतांश व्यक्ती प्रभावित झाल्या आहेत. तसेच, आधुनिक जीवनशैलीमुळे आकस्मिक आपत्कालीन परिस्थिती किंवा संसर्ग होण्याचा धोका अधिकच बळावला आहे. म्हणूनच, आपल्या सर्वांना एका टप्प्यावर आरोग्याबाबत दक्ष असणं निश्चितच महत्वाचे ठरणार आहे. आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीचा अंदाज वर्तविणं कुणालाही नक्कीच शक्य ठरणार नाही. मोजक्या व्यक्तींकडे आपत्कालीन वैद्यकीय स्थितीला सामोरे जाण्याची क्षमता असेल. मात्र, बहुतांश व्यक्तींसाठी आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीमुळे निश्चितच खिशावर ताण निर्माण होऊन आर्थिक आणीबाणीची स्थिती निर्माण होऊ शकते.
अशाप्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्याचा महत्वपूर्ण मार्ग म्हणजे हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीची निवड करणे होय. हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये हॉस्पिटलायझेशन पूर्वीचा आणि नंतरचा खर्च, शस्त्रक्रिया शुल्क, ओपीडीची बिले आणि विविध वैद्यकीय क्रिया ज्यामध्ये कॅन्सर, ह्यद्यविकार, मूत्रपिंडाचे विकार यांच्यासहित अन्य आजारांवरील उपचारांचा खर्च देखील समाविष्ट आहे. त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत आर्थिक सुरक्षा कवच प्रदान करणाऱ्या हेल्य़ इन्श्युरन्स पॉलिसीची निवड करण्याचा नेहमीच सल्ला दिला जातो.
*तपशीलवारपणे हेल्थ इन्श्युरन्स समजावून घेऊया :*
*हेल्थ इन्श्युरन्सचे लाभ :*
जगभरातील व्यक्तींना कोविड-19 महामारीच्या प्रकोपाला सामोरे जावे लागले. परंतु यामधून कधीही काहीही घडू शकते असा धडा निश्चितच आपल्या सर्वांना मिळाला. यादरम्यान, आपल्या सर्वांना हेल्थ इन्श्युरन्सचे महत्व देखील अधोरेखित झाले. विशेषकरुन आपत्कालीन वैद्यकीय स्थितीत सर्वांना जाणीव झाली. हेल्थ इन्श्युरन्स खरेदी करण्याची अनेक कारणे आहेत आणि जर तुम्ही खरेदीचा विचार करताना असे कारण तुम्हाला महत्वाचे वाटत नसतील. तर खालील कारणांची विस्तृत यादी पाहा. तुम्हाला निश्चितच जाणवेल हेल्थ इन्श्युरन्स नक्कीच खरेदी करायला हवा.
कुटुंबाचं सुरक्षा कवच – कुटुंबाचं संरक्षण हे प्रत्येकाच्या अग्रक्रमावर असतं. जर कौटुंबिक सदस्याला वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जावे लागल्यास आणि कोणत्याही आर्थिक चिंतेविना सर्वोत्तम उपचार तुम्ही प्रदान करू इच्छित असल्यास, हेल्थ इन्श्युरन्स तुमच्यासाठी निश्चितच लाभदायक ठरेल. खरंतर हे समजावून घ्यायला हवं की, 18-65 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती ही हेल्थ इन्श्युरन्स कव्हर खरेदी करण्यासाठी पात्र असेल आणि तसेच 90 दिवस ते 18 वर्षे वयोगटातील कोणतेही मुलेही समानपणे त्यासाठी पात्र ठरतात.
*विविध खर्चाना कव्हर -* वैद्यकीय महागाईमुळे उपचार खर्चातही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. म्हणूनच, हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी केवळ हॉस्पिटलायझेशन खर्चाला कव्हर करत नाही. यामध्ये तर रुग्णवाहिका शुल्क, रुम भाडे खर्च, नर्स शुल्क अशाप्रकारच्या अन्य खर्चाला याद्वारे कव्हर केले जाते.
*कॅशलेस उपचार -* “नेटवर्क हॉस्पिटल्स” म्हणजे इन्श्युरन्स कंपनीच्या नेटवर्कमध्ये समाविष्ट हॉस्पिटल्स. जेव्हा तुम्ही इन्श्युररच्या उपचारांसाठी या नेटवर्क हॉस्पिटल्सपैकी एक एन्टर करता, तेव्हा तुम्हाला फक्त तुमचे हेल्थ केअर कार्ड (किंवा तुमचा इन्श्युरन्स काँट्रॅक्ट नंबरही) दाखवावे लागेल. ज्यानंतर इन्श्युरर आणि हॉस्पिटल तुमच्या पॉलिसीच्या अटी व शर्तींनुसार तुमचे वैद्यकीय बिल सेटल करेल. जर तुम्ही नॉन-नेटवर्क हॉस्पिटल निवडले तर त्या प्रकरणातही तुम्हाला काळजी करावी लागणार नाही, तर तुम्हाला सुरुवातीला उपचारांसाठी पैसे भरावे लागतील आणि नंतर तुम्ही इन्श्युररकडे रिएम्बर्समेंट साठी अप्लाय करू शकता.
*मोफत वैद्यकीय तपासणी आणि इतर लाभ -* काही कंपन्या तुम्ही काही वर्षांमध्ये इन्श्युरन्सचा क्लेम केला नसल्यासच तुम्हाला विनामूल्य तपासणी प्रदान करतात. तथापि, अनेक इन्श्युरन्स कंपन्या आता त्यांच्या कस्टमर्सना मोफत लाभ म्हणून किंवा वेलनेस लाभांचा भाग म्हणून विनामूल्य वैद्यकीय तपासणी ऑफऱ करतात. हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीचा मजेदार लाभ एकत्रित बोनस किंवा सीबी म्हणून ओळखला जातो. जिथे तुम्ही पॉलिसीच्या कालावधीदरम्यान इन्श्युरन्सचा क्लेम न केल्यास तुमच्या पॉलिसीचा सम इन्श्युअर्ड विशिष्ट रकमेत वाढेल. हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी असण्याचा अतिरिक्त लाभ म्हणजे ओपीडी तसेच डे केअर उपचार इन्श्युरर द्वारे ऑफर केलेल्या निवडक हेल्थ पॉलिसी अंतर्गत कव्हर केले जातात
*टॅक्स लाभांचा आनंद घ्या -* प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80D अंतर्गत, तुम्ही तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीसाठी भरलेल्या प्रीमियमसाठी टॅक्स कपातीचा क्लेम करू शकता. 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींसाठी वजावट मर्यादा ₹25,000 पर्यंत आहे, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी रक्कम ₹50,000 पर्यंत आहे.
कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना सुरक्षित ठेवायला हवं. हेल्थ इन्श्युरन्स अशा आकस्मिक परिस्थितीत तुमच्यासाठी कवच ठरतो. “मला काहीही होणार नाही” अशा भ्रमात अनेक व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे त्या एकतर हेल्थ इन्श्युरन्सची निवड करत नाही किंवा त्यांच्याकडे पुरेसे कव्हरेज नसते. पण आपल्या सर्वांना ज्ञात आहे की, वैद्यकीय आपत्ती आकस्मिक येतात. आपल्या बचतीवर आघात त्यामुळे होतो. म्हणून, कोणत्याही वयात हेल्थ इन्श्युरन्स मधील गुंतवणूक नेहमीच परिपूर्ण ठरते. याचे तुम्हाला अनेक लाभ मिळतील. जसे की, कमी प्रीमियम आणि तितक्याच प्रमाणात कमी प्रतीक्षा कालावधीही. तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना आकस्मिक वैद्यकीय बिलांपासून संरक्षित करण्याचा खरंतर हा सर्वाधिक स्वस्त पर्याय आहे आणि सोबतच तुम्हाला गुणवत्तापूर्ण वैद्यकीय उपचारांची हमीही मिळते.
– लेखक : श्री. भास्कर नेरुरकर प्रमुख – हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन टीम, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स