
जळगाव ;- महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या मान्यतेने व नाशिक जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशन च्या सहकार्याने विभागीय युथ २१ वर्षा आतील व्हॉलीबॉल स्पर्धचे आयोजन ११ नोव्हेंबर रोजी शिवछत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सी.बी.एस. नासिक येथे करण्यात आलेले आहे.
सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जळगाव जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशन यांचे वतीने नूतन मराठा महाविद्यालय येथील व्हॉलीबॉल मैदानात निवड चाचणी घेण्यात आली यात जिल्ह्यातील ३५ मुलांनी सहभाग नोंदविला व त्यातून जिल्ह्याचा संघ निवडण्यात आला.
संघाची घोषणा अध्यक्ष फारुक शेख,सचिव अंजली पाटील व इफ्तेखार शेख यांनी केली. निवड झालेल्या खेळाडूंचे सराव शिबिर ७ ते १० नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे.ऋग्वेद डी इंगळे,केतन कमलाकर पाटील,विवेक सोपान बनाईत,(सर्व भालोद)चिरायू ज्ञानेश्वर बागुल,यश रवींद्र जंजाळे व हर्षद विलास भोसले व ओम कैलास गुरव (जळगाव),साहिल एकनाथ महाजन, तनवीर शेख ,मोमीन तडवी व हर्षल प्रवीण मिस्त्री(पाचोरा), निवड चाचणीत संघटनेचे राज्यस्तरीय पंच श्री दर्शन आटोळे, श्री धनंजय आटोळे, श्री निलेश चौधरी यांनी सहभाग घेतला.