खान्देशजळगांवशिक्षण

कष्टाची जोड असल्यास उद्योग-व्यवसायात यश निश्चित : नितीन बंग

जळगाव : – तरूणांनी आपल्यातील क्षमता ओळखून व्यवसाय करण्यासाठी पावले टाकावीत. मात्र व्यवसायात होणारे बदल स्वीकारून मेहनत आणि कष्ट करण्याची जोड दिली तर, व्यवसाय उद्योगात निश्चित यश प्राप्त होईल, असे मत कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे अध्यक्ष व उद्योजक नितीन बंग यांनी व्यक्त केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाच्यावतीने विद्यापीठ उद्योग संवाद शिखर परिषदेचे आयोजन मंगळवार दि. ७ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. या परिषदेचे उद्घाटन करतांना बंग बोलत होते. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी अध्यक्षस्थानी होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक तथा विन्ले पॉलीमर्सचे मुख्य कार्यकारी

प्रमोद संचेती, सोयो सिस्टीमचे मुख्य कार्यकारी किशोर ढाके उपस्थित होते तर, अतिथी म्हणून रवीकिरण कोंबडे तसेच प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांची उपस्थिती होती. या संवाद शिखर परिषदेला विद्यापीठ प्रशाळांमधील ३०५ विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून मोठा प्रतिसाद दिला. उद्योजक प्रमोद संचेती यांनी स्वप्नाला मेहनतीची जोड देण्याचा सल्ला दिला. रवीकिरण कोंबडे यांनी कौशल्य असलेले मनुष्यबळ प्राप्त व्हावे यासाठी विद्यापीठाने त्या पध्दतीचे अभ्यासक्रम आखावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी विद्यापीठात उत्तम प्रयोगशाळा आहेत. संशोधन आहे आणि विश्लेषण करण्याची क्षमता आहे. त्यांचा फायदा या भागातील उद्योजकांनी करावा असे आवाहन केले. प्रारंभी यांनी भाग घेतला. उद्घाटनानंतरच्या झालेल्या चर्चेत संतोष शिवाने (पुणे), संदीप जोशी (संभाजीनगर), गौसुद्दीन खान (हैद्राबाद), मोहम्मद फारूख खान (संभाजीनगर) तसेच उमेश सेठीया, सुरज धाजल, भाऊसाहेब चिमाटे, संजय पानीकर, डॉ. देवदत्त गोखले, संजय पवार, अरूण महाजन, हिमांशु उके, विरेंद्र छाजेड, प्रवीण सिंग, संजय शहा, संतोष बिरारी, रश्मी गोखले, रोहन मंत्री, भास्कर माळी, अनिल पवार, डॉ. जितेंद्र नारखेडे, डॉ. विशाल पराते, पवन मेश्राम यांनी केले.

सीटीपीसीचे समन्वयक प्रा. रमेश सरदार यांनी प्रास्ताविक केले. प्रा. जी. ए. उस्मानी यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. यश सोनवणे, सोनाली दायमा व प्रा. सरदार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. उपसमन्वयक प्रा. उज्ज्वल पाटील यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button