खान्देशजळगांवशासकीय

चौपदरीकरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

जळगाव ;- राष्ट्रीय मार्गाचे चौपदरीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. हे काम करताना काही त्रुटी राहिल्या आहेत. त्याच अनुषंगाने आमदार संजय सावकारे यांनी मागील महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली होती.

त्यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आश्वासन दिले होते.

दरम्यान, मंगळवारी (ता.७) सायंकाळी सहाच्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांनी चौपदरीकरणाची पाहणी केली.

पाहणी दरम्यान नवोदय विद्यालयासमोर सुशोभीकरण करणे, तसेच कुशल ऑफसेटजवळील अंडरपास पूर्ववत सुरू करणे, वांजोळा रोडजवळील अंडरपास सुरू करण्यासाठी उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांना व नगरपालिका मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांना निर्देश दिले आहेत.

त्यापुढे नाहाटा महाविद्यालय येथे सुशोभीकरण करणे, सुहास हॉटेलजवळील अंडरपास येथे मिरर लावणे व एमआयडीसीकडे जाणारा रस्त्यावर जागा उपलब्ध करून वळण रस्ता बनविण्यास निर्देश दिले आहेत.

खडका चौफुली येथील वाहतूक रहदारीस अडथळा आणणारे विषय मार्गी लावण्यास सांगितले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button