गुन्हेजळगांव

रेल्वे आरक्षण तिकिटाचा काळाबाजार करणाऱ्याला अटक

भुसावळ (प्रतिनिधी) :- भुसावळ रेल्वे स्थानकावर तिकिटाचा काळाबाजार करणाऱ्या एकाच्या मुसक्या रेल्वे पोलिसांनी आवळल्या असूनजहिद अली इकबाल अली सय्यद (वय ३४, रा. जाम मोहल्ला, भुसावळ) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.

रेल्वे पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार उपनिरीक्षक पि.के. दीक्षित आणि जितेंद्र कुमार मिश्रा व त्यांच्या पथकाने दक्षिण बाजूच्या रेल्वे आरक्षण कार्यालयाजवळ तपासणी केली. तिथे खिडकी क्रमांक १ जवळ १ व्यक्ती तिकीट काढून घाईघाईत जाताना त्यांना दिसला पोलिसांनी त्यालाताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली. मात्र त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली.त्याला संशयास्पद स्थितीत पोलीस स्टेशनला आणले. तेव्हा त्याच्याकडून एक तत्कालचे तिकीट मिळून आले आहे. कमिशन मिळण्याच्या आमिषाने लोकांकडून अधिक पैसे घेऊन एजंटगिरी करीत असल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक एन. के. सिंह करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button