खान्देशजळगांवशासकीय

जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना अन्न सुरक्षे विषयी प्रशिक्षण

अन्न व औषध प्रशासनाचा उपक्रम

जळगाव,;– सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील ३१५ अंगणवाडी सेविका, बचतगट, अन्न व्यावसायिकांना अन्न पदार्थ तयार करतांना घ्यावयाची काळजी या विषयावर प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे २१ व २२ नोव्हेंबर रोजी प्रशिक्षण सत्र पार पडले.

अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ व नियम, नियमन २०११ अंतर्गत अन् सुरक्षा व मानके प्राधिकरणाने (FSSAI) आपल्या नागरिकांना सुरक्षित अन् आणि निरोगी आहाराची उपलब्धता आणि वापर सुनिश्चित करुन भारताच्या अन्न सुरक्षा आणि पोषण परिवर्तन घडवून आणण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत.

त्यातील अंगणवाडी सेविका, बचतगट व व्यावसायिक महत्त्वाचे घटक आहेत. ह्यांना नोंदणीकृत एजन्सी मार्फत फॉस्टॅक प्रशिक्षण (fostac training) देण्यात आले. त्यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत सामंजस्य करारातून सुमारे ३१५ अंगणवाडी सेविका, बचतगट व व्यावसायिकांना प्रशिक्षण देण्यात आले.

प्रशिक्षणात अन्न पदार्थ तयार करताना काय काळजी घ्यावयाची, अन्न पदार्थ कशा प्रकारे हाताळयाचे, विशेषतः अंगणवाडी सेविकांचा अंगणवाडीत दररोज अन्न पदार्थ तयार करावे लागतात त्यांनी काय काळजी घ्यावी, याबाबत विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणार्थीना मिळालेल्या प्रशिक्षणाबाबत समाधान व्यक्त केले आहे.

प्रशिक्षण सत्र अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे, नाशिक विभाग सह आयुक्त सं.भा. नारगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात आले होते. अन्न सुरक्षा अधिकारी श. म. पवार, कर्मचारी मी.ए.साळी, स.न.बारी, श्रीमती क.र. पाटील, प्र.मा. धोंडकर, प्र.स. वळवी, चं.रा. सोनवणे यांनी सर्व प्रशिक्षणार्थींची ऑनलाईन नोंदणी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button