खान्देशगुन्हेजळगांव

फ्लॅट घेण्यासाठी विवाहितेचा छळ ;सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा

जळगाव : फ्लॅट घेण्यासाठी माहेरुन पैसे आणावे यासाठी सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सासरच्या मंडळींविरुद्ध रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील सुयोग कॉलनीतील माहेर असलेल्या चेतन अभिनव तायडे यांचा विवाह भुसावळ येथील दीपनगर वसाहतीमधील अभिनव तायडे यांच्यासोबत झाला आहे. फ्लॅट घेण्यासाठी विवाहितेने माहेरुन पेसे आणावे यासाठी सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा छळ केला जात होता. हा छळ असह्य झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यांनी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. त्या तक्रारीवरुन पती अभिनव अनिल तायडे, सासरे अनिल बाबूराव तायडे, सासू मंगल अनिल तायडे, नणंद गायत्री दीपक कोळी सर्व रा. गजानन नगर दीपनगर औष्णींक केंद्र भुसावळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ सुनिल पाटील हे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button