खान्देशगुन्हेजळगांव

जळगावात मध्यरात्री ज्वेलर्स दुकानातून ११ लाखांचे दागिने लांबवीले

जळगाव : दुकानाच्या शटर लॉक तर आतील चॅनलगेटचे कोयंडे कापून कारागिरांच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले पावणेअकरा लाख रुपये किंमतीचे १८९ ग्रॅम सोने आणि सोन्याचे रॉ मटेरियल चोरले. ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील जोशीपेठमधील संभव ज्वेलर्स या दुकानात घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील आदर्श नगरात किशोर ओमप्रकाश वर्मा हे वास्तव्यास असून त्यांचे जोशीपेठ परिसरातील कालभैरव मंदिराजवळ संभव ज्वेलर्स नावाने सोन्याचे दुकान आहे. दुकानाच्या पहिल्या मजल्यावर वर्मा यांचे ऑफिस आहे तर दुसऱ्या मजल्यावर सोन्याचे दागिने बनविण्याचे काम सुरु असते.

त्यांच्याकडे आठ कारागिर असून ते गेल्या अनेक वर्षांपासून बंगाली कारागिर सोन्याचे दागिने तयार करण्याचे काम करतात. त्यातील चार कारागिर हे गेल्या तीन तेमहिन्यांपुर्वी गावी निघून गेले आहेत. हे कारागिर सकाळी ९ ते रात्री दहा वाजेपर्यंत सोन्याचे दागिने तयार

करण्याचे काम करतात. त्यामुळे वर्मा हे वडीलांसह दुकानाचे शटर उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी जात असतात. वर्मा यांनी खरेदी केलेले सोने हे ऑर्डप्रमाणे त्यांचे दागिने बनविण्यासाठी त्याला मेल्टींग करुन ते कारागिरांकडे देवून त्यांच्याकडून दागिने बनवून घेतात.

मालकासह कारागिर निघून गेले घरी किशोर वर्मा यांनी त्यांच्याकडे काम करणारा कारागिर मिलन चित्तरंजन पाकिरा याला दोन ते तीन दिवसांपुर्वी १०० ग्रॅम तर सुधार मदनसामंत याच्याकडे १०० ग्रॅम तर सुशांत राधानाथ मायती याच्याकडे ४८ ग्रॅम सोन्याचे दागिने तयार करण्यासाठी दिले होते. मंगळवारी दिवसभर काम केल्यानंतर वर्मा हे रात्री साडेआठला तर त्यांचे कारागिरहे रात्री दहा वाजता दुकान बंद करुन त्यांच्या रुमवर निघून गेले.

दुकानाचे शटरसह चॅनल गेट तोडून केला प्रवेश मंगळवारी पहाटे सव्वा चार वाजेच्या सुमारास किशोर वर्मा यांना त्यांच्यादुकानाजवळ राहणाऱ्या अनिल वर्मा यांनी तुमच्या दुकानात चोर घुसल्याची माहिती दिली. त्यानुसार वर्मा हे वडील व मोठ्या भावाला घेवून तात्काळ दुकानावर आले. यावेळी त्यांना दुकानाचे लहान शटरचे कान तर आतील चॅनल गेट कोयंडे तुटलेले दिसले. त्यांनी दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावर

जावून पाहणी केली. डीवायएसपींची घटनास्थळी पाहणी घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक संदीपगावित, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर फॉरेन्सीक व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button