खान्देशजळगांव

वृद्धाच्या हातातून मोबाईल हिसकावला ; गुन्हा दाखल

जळगावः रथाचे दर्शन घेण्यासाठी वृद्धाच्या हातातून मोबाईल लांबवल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास दाणाबाजार परिसरात घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील महाबळ परिसरातील मायदेवी नगरात मकरंद पुरूषोत्तम पाठक (वय-६१) रहे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे, टॅक्स असिस्टंट म्हणून ते काम पाहतात. कार्तीक एकादशी निमित्त गुरूवारी दि. २३ नोव्हेंबर रोजी श्रीराम रथोत्सव काढण्यात आला होता. हा रथ सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शहरातील दाणबाजार परिसरत आलेला होता. त्यावेळी मकरंद पाठक हे देखील दर्शनासाठी आलेले होते.

त्यावेळी त्यांच्या हातातील २८ हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी झटका देवून लांबविला. ही घटना घडताच पाठक यांनी चोरट्याचा पाठलाग केला परंतु चोरटा गर्दीचा फायदा घेवून पसार झाला. त्यानंतर पाठक यांनी शुक्रवारी २४ नोव्हेंबर रोजी दुपारी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button