खान्देशगुन्हेजळगांव

तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा

जळगाव : तालुक्यातील देव्हारी येथील विशाल राजेंद्र सपकाळे व त्याचा मित्र विशाल सुधाकर गुडवे हे दि. १० जुलै रोजी (एमएच १९ डीजी ५५१३) क्रमांकाच्या दुचाकीने गावाकडे जात होते. दरम्यान, (एमएच १९ सीडबल्यू १९४७) क्रमांकाच्या पॅजो रिक्षाने दुचाकीला जोरदार धडक दिली.

यामध्ये विशाल सपकाळे याच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी धडक देणाऱ्या रिक्षा चालक सलमान हमीद शेख (रा. मेहरुण) याच्याविरुद्ध एमआयडीयसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button