यावल : – येथून जवळच असलेल्या थोरगव्हाण येथे एका २१ वर्षीय तरूणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेतला. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली व हा प्रकार कुटुंबींयाच्या निदर्शनास येताच या तरुणाला तेथून काढून तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. तेव्हा याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
थोरगव्हाण ता. यावल येथील रहिवासी मच्छिंद्र विनोद पाटील वय २१ हा तरुण शुक्रवारी दुपारी आपल्या घरी होता. दरम्यान राहत्या घरात त्याने छताच्या कडीला दोरीने बांधून गळफास घेतला. हा प्रकार कुटुंब आणि नातेवाईकांच्या निदर्शनात येताच त्याला तातडीने एका वाहनात टाकून यावल ग्रामीण रूग्णालयामध्ये आणण्यात आले. यावल ग्रामीण रूग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पोलीस पाटील गजानन चौधरी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी करीत आहे.