खान्देशगुन्हेजळगांव

जामनेर येथून तरुणी तर भडगाव , बोदवड तालुक्यातून तरुण बेपत्ता

जळगाव ;- जामनेर तालुक्यातून एका गावातून १८ वर्षीय तरुणी तर भडगाव,बोदवड तालुक्यातून दोन तरुण बेपत्ता झाले असून याबाबत त्या त्या पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आलेली आहे.

याबाबत माहिती अशी कि, जामनेर तालुक्यातून एका गावातून १८ वर्ष वयाची तरुणी २ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेनंतर घरात कुणालाही न सांगता निघून गेली. तिचा कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला असता ती न मिळून आल्याने तिच्या वडिलांनी फिर्याद दिल्यावरून जामनेर पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली असून तपास पोहेकॉ जयेंद्र पगारे करीत आहे.

भडगाव शहरातून तरुण बेपत्ता

शहरातील यशवंत नांगर येथे राहणार २१ वर्षीय संजू सदाशिव फाजगे (मतिमंद ) हा ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास काही एक न सांगता निघून गेला . त्याचा सर्वत्र शोध घेतला असता मिळून न आल्याने अखेर त्याच्या आईने भडगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या खबरीवरून हरविल्याची नोंद करण्यात आली असून तपास पोहेकॉ विजय जाधव करीत आहे.

बोदवड येथून तरुण बेपत्ता

भजन करायला जातो सांगून बोदवड तालुक्यातील शेलवड येथून १ रोजी लोकेश मंगल पाटील वय २२ हा निघून गेल्याने त्याचे वडील मंगल पाटील यांनी बोदवड पोलीस स्टेशनला दिलेल्या खबरीवरून मिसिंगची नोंद करण्यात आली असून तपास पोहेकॉ संतोष चौधरी करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button