जळगाव ;- शहरातील तिजोरी गल्ली परिसरात असणाऱ्या एका हॉटेल जवळ सार्वजनिक जागी दोन अनोळखी इसमांनी एका व्यक्तीचा १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेल्याची घटना 3 डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली . या प्रकरणी दोन अनोळखी चोरट्यांविरुद्ध जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की शेख आली हुसेन शेख अंबर अली (वय 31 )रा. जोशी पेठ बागवान गल्ली याच्या जवळील १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल तिजोरी गल्ली येथे ३ रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास मोटरसायकलवर आलेल्या दोन अनोळखी इसमांनी चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी शेख आली हुसेन शेख अंबर अली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस स्टेशनला दोन अनोळखी इस्मानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस कॉन्स्टेबल किशोर निकुंभ करीत आहे.